महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 13, 2020, 4:47 PM IST

Updated : May 13, 2020, 7:22 PM IST

ETV Bharat / state

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 152 पोलिसांना घरीच थांबण्याचे आदेश

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 152 पोलिसांना घरीत थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिलील.

अपर पोलीस अधीक्षक अतूल झेंडे
अपर पोलीस अधीक्षक अतूल झेंडे

सोलापूर - सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 152 पोलिसांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी आणि पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस दलातील 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 14 अधिकारी आणि 138 कर्मचारी यांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा बाजविणाऱ्या 14 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. वयस्कर असलेल्यांना कोरोनाचा जास्तीत जास्त धोका असल्यामुळे 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणतेही काम न देता त्यांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

माहिती देताना अपर पोलीस अधीक्षक अतूल झेंडे
कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी पोलीस दलातील कर्मचारी हे दिवस रात्र सेवा बजावत आहेत. विविध ठिकाणी पोलिसांना बंदोबस्तांचे काम करावे लगते.तसेच कंटेनमेंट झोनमध्येही त्यांना आपले कर्तव्य पार करावा लागतो. यामुळेच पोलिसांना देखील कोरोनाची लागण व्हायला सुरूवात झाली आहे. प्रत्यक्ष काम करत असताना वयस्कर पोलिसांना कर्तव्यावर न पाठवण्याची भूमिका सोलापूर ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे. यामुळे 55 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या 14 अधिकारी आणि 138 पोलिसांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

ज्या पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आणि 55 पेक्षा कमी आहे, त्या पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कंटेनमेंट झोनमध्ये पाठविण्यात येणार नाही. जे पोलीस कर्मचारी व अधिकारी हे सेवा बजावत आहेत त्यांना देखील रोग प्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठीचे उपाय सूचविण्यात आले आहेत. तसेच पोलिसांच्या मदतीला ग्रामीण भागातील सशक्त असलेल्या तरुणांची मदत ही घेण्यात येत असल्याचेही झेंडे यांनी सांगितले.

हेही वाचा -सकारात्मक बातमी.. सोलापुरातील 31 जणांनी केली कोरोनावर मात

Last Updated : May 13, 2020, 7:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details