सोलापूर -जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बुधवारी सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात 1449 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच शहर आणि जिल्ह्यात एकूण 40 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन एकीकडे आटोकाट प्रयत्न करत आहे. आजही अनेक नागरिकांना याचे गांभीर्यच नाही. कारण लॉकडाऊन करूनदेखील शहरात आणि ग्रामीण भागात रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार याकडे आरोग्य प्रशासन आणि पोलीस प्रशासन याची वाट पाहू लागले आहेत.
सोलापूर ग्रामीणमध्ये 18 तर शहरात 22 अशा एकूण 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे अहवाल आज आले आहेत. सध्या सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 11,494 आहे.