सोलापूर - शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरात शुक्रवारी नव्याने 102 रूग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर कोरोनामुळे शहरात दोघांचा मृत्यू झाला.
सोलापूर जिल्ह्यात 102 नव्या कोरोना रूग्णांची भर ; तर 2 जणांचा मृत्यू - सोलापूर कोरोना अपडेट
शहरात शुक्रवारी नव्याने 102 रूग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर कोरोनामुळे शहरात दोघांचा मृत्यू झाला. शहरातील एकूण रुग्ण संख्या 2 हजार 499 झाली आहे. शुक्रवारी एकूण 342 अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 240 निगेटिव्ह आले आहेत.
शहरात शुक्रवारी तब्बल 102 नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे. शहरातील एकूण रुग्ण संख्या 2 हजार 499 झाली आहे. शुक्रवारी एकूण 342 अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 240 निगेटिव्ह आले आहेत. तर 102 अहवाल हे पॉझिटिव्ह आहेत. अजूनही एकूण 369 अहवाल प्रलंबित आहेत.
शुक्रवारी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 263 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून मूक्त झालेल्या 3 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 1 हजार 384 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर 852 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.