पंढरपूर -कोकणासह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पंचगंगा व कृष्ण नदीच्या महापूर हाहाकार उडाला आहे. त्यामुळे लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. नागरिकांचे संसार उघड्यावर आले. अशा संवेदनशील परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पूरग्रस्तांना 1000 चादरीची मदत सोलापूरहून पाठवत असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिली आहे.
मनसेद्वारे पूरग्रस्तांसाठी 1000 चादरींची मदत
मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा सहकार मंत्री दिलीप बापू धोत्रे यांच्या माध्यमातून ही मदत देण्यात येत आहे. तसेच येत्या काळात पूरग्रस्तांना अधिकची मदत करण्याच्या दृष्टीने देखील वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शनिवारी सायंकाळी 1000 सोलापूरी चादरी घेऊन सोलापूरातून कोल्हापूरकडे वाहन रवाना झाले.
मनसेद्वारे मदत
1000 सोलापुरी चादरींची मदत
मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा सहकार मंत्री दिलीप बापू धोत्रे यांच्या माध्यमातून ही मदत देण्यात येत आहे. तसेच येत्या काळात पूरग्रस्तांना अधिकची मदत करण्याच्या दृष्टीने देखील वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शनिवारी सायंकाळी 1000 सोलापूरी चादरी घेऊन सोलापूरातून कोल्हापूरकडे वाहन रवाना झाले.
हेही वाचा -राज्यात अतिवृष्टीने ११२ जणांचा मृत्यू, ९९ लोक बेपत्ता