महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी महामार्गासाठी १०० हेक्टर क्षेत्र संपादित : प्रांताधिकारी-सचिन ढोले - राष्ट्रीय महामार्ग वर नवीन पुलाची उभारणी..

मोहोळ ते आळंदी या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावरील (क्र.९६५) पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील १९ गावांचा समावेश असून, या महामार्गासाठी १०० हेक्टर संपादित करण्यात आली असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

Palkhi Highway
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी महामार्ग

By

Published : Dec 31, 2020, 7:56 PM IST

पंढरपूर - संत ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावरील चौपदरीकरणाचे काम गतीने सुरु असून, भीमा नदीवरील पंढरपूरला जोडणाऱ्या गुरसाळे - कौठाळी पुलाचे भूमिपूजन प्रांताधिकारी ढोले यांच्या हस्ते गुरुवार करण्यात आला.

पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांकडून संत ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावरील चौपदरीकराणासाठी १६० हेक्टर क्षेत्र संपादित करावयाची असून त्यापैकी १०० हेक्टर क्षेत्र ताब्यात घेण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील १३ गांवे तर मोहोळ तालुक्यातील ६ गावे अशा एकूण१९ गावांचा समावेश आहे. या महामार्गावरील ८५ टक्के प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात आला आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांना लवकरच भुसंपादनाचा मोबदला वाटप करण्यात येणार असल्याचेही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग वर नवीन पुलाची उभारणी..

पंढरपूर ते आळंदी हा राष्ट्रीय महामार्ग बायपाससाठी गुरसाळे - कौठाळी या दरम्यान हा नवीन पूल उभा राहतो आहे. या पुलाची रुंदी ३२ मीटर्स तर लांबी ५२५ मीटर्स इतकी आहे. महापुरामुळे पंढरपूरशी अनेक गावांचा संपर्क तुटतो. तसेच अहमदनगर, मराठवाडा, विदर्भात पंढरपूरकडे येणाऱ्या वाहनांचाही संपर्क तुटत असतो पुलाची उंची व रुंदी जास्त असल्याने वाहतुक व्यवस्था सुरळीत सुरु राहील. वारी कालावधीत वाहतुक नियंत्रणासाठी या पुलाचा वापर होईल.

नवीन पुलामुळे विकासाला चालना मिळणार

महामार्गावरील नवीन पुलामुळे वाखरी, गुरसाळे, आढीव, देगांव आदी गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. संबधित गावे पंढरपूर शहराशी जोडल्याने विकासाला चालना मिळणार आहे. तसेच या भागात साखर कारखाने असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गासाठी पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातील १९ गावातील प्रकल्पग्रस्तांनी व नागरिकांनी योग्य सहकार्य केल्याने महामार्गाचे काम गतीने सुरु असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details