महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 3, 2022, 7:11 PM IST

ETV Bharat / state

Kannada Bhavan in Akkalkot : अक्कलकोट तालुक्यात कन्नड भवन उभारण्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर

महाराष्ट्र आणि कर्नाटक सिमावाद सुरु असतांनाच आता, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेळगाव येथील (Karnataka Chief Minister announced in Belgaum) एका कार्यक्रमात, सोलापुरातील अक्कलकोट मध्ये कन्नड भवन उभारणी (construction of Kannada Bhavan in Akkalkot taluka) साठी दहा कोटींचा निधी (10 crore fund approved) देण्याचे जाहीर केले.

Kannada Bhavan in Akkalkot
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बेळगाव येथे घोषणा

सोलापूर : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेळगाव येथील एका कार्यक्रमात जाहीर (Karnataka Chief Minister announced in Belgaum) केले आहे की,सोलापुरातील अक्कलकोट मध्ये कन्नड भवन उभारणी साठी (construction of Kannada Bhavan in Akkalkot taluka) दहा कोटींचा निधी (10 crore fund approved) दिला आहे. यावरून सोलापूर आणि महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अक्कलकोट मधील कन्नड वैदिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन करपे व कन्नड साहित्य परिषदेचे सोमशेखर जमशेट्टी यांनी याबाबत माहिती दिली.

प्रतिक्रिया देतांना मल्लिनाथ करपे व सोमशेखर जमशेट्टी

कन्नड भवन उभारण्यात येणार : कर्नाटकच्या सीमावर्ती भागात आजही मुलभूत सुविधा नाहीत. नागरिकांना भयंकर अशा सामाजिक समस्यांनातोंड द्यावे लागते. येथील नागरिकांना वेळीच मदत मिळत नाही, अशी खंत यावेळी व्यक्त केली. अक्कलकोट मध्ये डॉ जगदेवी लिगाडे या मोठ्या कन्नड साहित्यिक होऊन गेल्या. यांच्या नावाने हे कन्नड भवन उभारण्यात येणार आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे, लवकरच जमीन अधिग्रहण करून कामकाज सुरू करण्यात येणार आहे.

बहुभाषिक जनतेसाठी याचा उपयोग :अक्कलकोट तालुक्यात मोठ्या संख्येने कन्नड बहुभाषिक नागरिक वास्तव्य करतात. गेल्या अनेक वर्षांपासून येथे कन्नड भाषेचा विकास झाला आहे. अक्कलकोट तालुक्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने जवळपास 71 शाळा कन्नड माध्यमातून सुरू आहेत. 7 हजार विद्यार्थी कन्नड भाषेत शिक्षण घेत आहेत. या अक्कलकोट तालुक्यात डॉ जगदेवी लिगाडे यांच्या नावाने ,कन्नड भवन उभारले असता, या तालुक्यातील कन्नड भाषेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम कन्नड भवन मध्ये घेतले जातील. कन्नड बोलणाऱ्या जनतेला याचा मोठा फायदा होईल, अशी माहिती मल्लिकार्जुन करपे आणि सोमशेखर जमशेट्टी यांनी दिली.

आम्हाला तर कर्नाटक बरं वाटतंय :महाराष्ट्र आणि कर्नाटकची तुलना केली असता, कर्नाटक राज्यातील सोयीसुविधा महाराष्ट्रपेक्षा चांगल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कारण सीमावर्ती भागात महाराष्ट्र राज्य शासन आजही अनेक सुविधा देण्यात असमर्थ आहे. तेथून जवळच असलेल्या कर्नाटक सीमावर्ती भागात रस्ते, वीज, पाणी याची चांगली सुविधा उपलब्ध आहे. आम्हाला असे वाटते की, महाराष्ट्र पेक्षा कर्नाटक उत्तम आहे. अक्कलकोट तालुक्यात आजही 8 ते 10 दिवसांनंतर पिण्याचे पाणी येते, पाण्याची सुविधा देखील महाराष्ट्र शासन उपलब्ध करण्यात सपशेल अपयशी ठरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details