महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चालत्या रेल्वेतून उतरताना कणकवलीत तरुण जखमी - Youth injured in falling off train

मंबईहून मडगावला जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसमधून कणकवली रेल्वे स्थानकात उतरताना तरुण प्लॅटफॉर्मवर कोसळून जखमी झाला. या अपघातात त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली.

young-man-was-injured-when-he-fell-on-a-platform-while-getting-off-the-train
चालत्या रेल्वेतून उतरताना कणकवलीत तरूण जखमी

By

Published : Mar 4, 2020, 5:22 PM IST

सिंधुदुर्ग -मुंबईहून मडगावला जाणारी मंगला एक्सप्रेस कणकवली रेल्वे स्थानकात थांबत असतानाच चालत्या गाडीमधून उतरण्याचा प्रयत्न करताना एक तरुण प्लॅटफॉर्मवर कोसळून जखमी झाला. राजेंद्र दिंगबर पेंदाम असे तरुणाचे नाव असून तो मालवणचा आहे. या अपघातात त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे.

चालत्या रेल्वेतून उतरताना कणकवलीत तरूण जखमी

ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. घटनेनंतर रेल्वे सुरक्षा दलाचे कॉन्स्टेबल राधेश्याम यांनी राजेंद्रला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. राजेंद्रवर उपचार केल्यानंतर त्याला सोडण्यात आल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details