सिंधुदुर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली शहरातील एका युवकाने बुधवारी थेट फेसबुक लाईव्ह करत दोरीने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला ( Suicide attempt on Facebook live ) आहे. त्या तरुणाची प्रकृती खालावली असल्याने त्याला कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्या युवकांने आत्महत्येचा प्रयत्न कोणत्या कारणातून केला ? त्याबाबत कारण अस्पष्टच आहे.
Suicide Attempt in Sindhudurg : फेसबुक लाईव्ह करत युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर - suicide Attempt in Sindhudurg
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली शहरातील एका युवकाने बुधवारी थेट फेसबुक लाईव्ह करत दोरीने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला ( Suicide attempt on Facebook live ) आहे.आत्महत्येचा प्रयत्न कोणत्या कारणातून केला ? त्याबाबत कारण अपष्टच आहे. सध्या कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
फेसबूक पेजवरून लाईव्ह : कणकवली शहरात राहणाऱ्या विशाल ठाणेकर या तरुणाने चक्क आपल्या फेसबुक पेजवरून लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरातील लाकडाला दोरीचा गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न ( suicide Attempt by hanging ) केला. काही वेळ हा तरुण या गळफासाला लटकत होता अखेर त्याच्या नातेवाईकांच्या हि बाब लक्षात आल्यानंतर त्याला फासावरून उतरवण्यात आले. दरम्यान या तरुणाची प्रकृती गंभीर झाली आहे.
प्रकृती स्थिर : अत्यावस्था अवस्थेत या तरुणाला कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दारूच्या नशेत या तरुणाने हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस या ठिकाणी दाखल झाले. या तरुणाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला हे अध्यापयी स्पष्ट झालेले ( suicide Attempt in Sindhudurg ) नाही.