सिंधुदुर्ग - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कणकवली शाखेने फोडघाट येथे एका जणाच्या घरावर छापा टाकला. यामध्ये गोवा बनावटीची ३ लाख रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. तसेच एका आरोपीला अटक करण्यात आली.
सिंधुदुर्गमध्ये ३ लाखांची दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - सिंधुदुर्ग दारू जप्त न्युज
सिंधुदुर्ग येथील कणकवली तालुक्यातील फोडघाट येथे जवळपास ३ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तसेच एका आरोपीला देखील अटक करण्यात आली.
विनोद दिगंबर पवार (४८ वर्ष), असे आरोपीचे नाव आहे. फोडघाट येथे संबंधित आरोपीच्या घरात दारूसाठा असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आज छापा टाकला. यावेळी त्याच्या घरात खड्डा खोदून दारू ठेवली असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हा सर्व दारूसाठा जप्त केला असून याची किंमत जवळपास ३ लाख पाच हजार रुपये असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभाग कणकवलीचे पोलीस निरीक्षक भगत यांनी सांगितले. ही कारवाई सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळलक्ष्मण राणे, जे. आर. चव्हाण, स्नेहल कुवसेकर, साजिद शाह यांनी केली.