सिंधुदुर्ग - आपले इवलुसे पंख पसरून राज्यातील सर्व जिल्हे आपल्या कवेत घेण्यासाठी निघालेली एक निसर्गकन्या म्हणजेच प्रणाली चिकटे. पुनवट, यवतमाळ येथून गेल्या सात महिन्यात एकोणीस जिल्ह्यांचा प्रवास करत ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन पोहोचलीय. या साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करत ती येथे पोहोचली आहे. आजच्या जागतिक सायकल दिनानिमित्त जाणून घेऊया तिची मनसोक्त सायकल भ्रमंती.
प्रणाली एकटीने करतेय महाराष्ट्र दौरा -
प्रणाली ही शिक्षणसमाजसेवा विषयात पदवीधर आहे. पर्यावरणाचा, निसर्गाचा जवळून अभ्यास करण्याची तिला आवड आहे. निसर्ग खूप बदलत आहे, तापमान वाढ, ऋतुचक्रात होणारा बदल, सभोवतालचे वाढते प्रदूषण यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याचा आणि शेतीच्या समस्या खुप वाढत आहेत. यावर आपण काही करू शकतो का ! असा विचार तिच्या मनात आला आणि सुरु झाला एक ध्येयवेडा प्रवास. आपल्या स्वखर्चाने घेतलेल्या सायकलसोबत संपूर्ण महाराष्ट्र फिरायचं, तिथल्या लोकांना वाढत्या प्रदूषणाच्या समस्यांबाबत, निसर्गाच्या संगोपनाबाबत जागृत करायचं, वेगवेगळ्या भागातल्या निसर्गाचा आणि माणसांचा अभ्यास करायचा, स्थानिक पर्यावरणाविषयी जाणून घ्यायचं असं ठरवून तिने हा सायकल प्रवास सुरु केला. ती हा महाराष्ट्र दौरा एकट्यानं करतेय. तिचा हा प्रवास स्वतःच्या जबाबदारीवर सुरु आहे.
अडथळा मार्ग रोखू शकत नाही -
या प्रवासात ती जिथे जाईल, तिथले लोकच तिला मदत करतात. राहण्या-खाण्याच्या सोईसोबत काहीजण आर्थिक मदतही करतात. एक मुलगी असून तिने शारीरिक, सामाजिक समस्यांची पर्वा न करता सुरु केलेला हा प्रवास अनेकांना स्फुर्तीदायक असाच आहे. तिच्या प्रवासाच्या मुक्कामात ती महिला सक्षमीकरणावर विशेष भर देते. आपली इच्छाशक्ती जर दांडगी असेल, तर कोणताच अडथळा आपला मार्ग रोखू शकत नाही. याचे प्रणाली हे एक उत्तम उदाहरण असेच म्हणावे लागेल.
कुटुंबाच्या पाठींब्यामुळे इथपर्यंतचा प्रवास -