सिंधुदुर्ग -संपुर्ण जगभर सध्या कोरोना विषाणूची दहशत आहे. देशात आणि राज्यातही कोरोनाचा संसर्ग होत आहे. राज्यात कोरोनाचे संकट असताना सिंधुदुर्गमध्ये मात्र माकडतापाने दहशत घातली आहे. माकडतापाने आतापर्यंत जिल्ह्यात दोन रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे आज (शुक्रवार) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी आरोग्य यंत्रणेची आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना सामंत यांनी तापावर लवकरच नियंत्रण मिळवले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
माकडतापही लवकरच नियंत्रणात येईल - उदय सामंत
राज्यामध्ये एकीकडे कोरोना विषाणूची दहशत असतानाच दुसरीकडे कोकणातील सिंधुदुर्गमध्ये माकडतापाचे संकट आले आहे.
हेही वाचा...'कोरोना'चा कहर : सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सतर्क
राज्यामध्ये एकीकडे कोरोनाची दहशत असताना दुसरीकडे सिंधुदुर्गमध्ये माकडतापाचे संकट आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत माकडतापाने दोन जण दगावले आहेत. या माकडतापावर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. आणखी उपाययोजना करण्याबाबतचे आदेश आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत, असे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच जिल्हा नियोजन समितीकडून माकडांना प्रतिबंधित करण्यासाठी प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. त्यावर सरकारकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. मात्र, कोरोनावर मात करण्यासाठी आपण सज्ज आहोत, तसेच माकडतापावर देखील लवकरच नियंत्रण मिळवू, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.