महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात हे प्रथमच घडलंय.! संपूर्ण जिल्हाच सीसीटीव्हीच्या कक्षेत, गृहमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण - sindhudurg news today

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नागरिकांची सुरक्षितता आणि गुन्हे नियंत्रण करण्यासाठी एकूण 93 ठिकाणी 280 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा आज (मंगळवार) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पार पडला.

cctv camera
सीसीटीव्ही कॅमेरा

By

Published : Jul 29, 2020, 2:23 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील गुन्हे नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही हे अत्यंत उपयुक्त असल्याचे नमुद करताना, संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळाल्याचे कौतुक असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीसीटीव्ही सनियंत्रण योजनेचे आज (मंगळवार) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.

या सोहळ्यास खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम हे जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये उपस्थित होते. तर, आमदार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्यासह सर्व नगराध्यक्ष, पोलीस ठाण्याचे प्रमुख हे ऑनलाईन उपस्थित होते.

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हाच सीसीटीव्हीच्या कक्षेत, गृहमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

हेही वाचा -पावसाळी अधिवेशन पुन्हा पुढं ढकललं.. तीन ऑगस्टला होणारं पावसाळी अधिवेशन आता 'या' तारखेपासून होणार सुरू

गुन्हेगारी कमी करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे हे उपयुक्त आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात जिल्ह्याील पोलीस दल, महसूल यंत्रणा आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करत आहे. त्यांच्या कामाचे मला कौतुक असल्याचेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले यावेळी बोलताना म्हणाले की, डीपीडीसीमधून मिळालेल्या निधीचा सदुपयोग जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. ही यंत्रणा जिल्ह्यासाठी नक्कीच वरदान ठरणार आहे. गुन्हेगारी कमी करण्यासोबतच यामुळे जिल्ह्याच्या विकासालाही चालना मिळणार आहे. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले. आमदार दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्ममातून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचेही सांगितले.

आमदार नितेश राणे यांनीही यावेळी पोलीस दलाचे अभिनंदन केले. तसेच अशा चांगल्या कामांमध्ये सर्वांनी एकत्र काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकारी म्हणाले की, या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील महिला अधिक सुरक्षित होतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नागरिकांची सुरक्षितता आणि गुन्हे नियंत्रण करण्यासाठी एकूण 93 ठिकाणी 280 कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details