महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात सापडले व्हेलमाशाच्या उल्टी सदृष्य पदार्थ; मच्छिमाराने दिले वनविभागाच्या ताब्यात - Whale vomit like substance found

देवगड तारामुंबरी येथील समुद्र किनाऱ्यावर एक मच्छीमाराला चिकट पदार्थ आढळला. हा चिकट पदार्थ वनविभागाने ताब्यात घेतला आहे. हा पदार्थ व्हेल माशाची उलटी आहे का, हे तपासण्यासाठी वनविभागाने या पदार्थाचा काही भाग पुणे येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे.

Whale vomit like substance
व्हेल माशा उलटी सारखे पदार्थ

By

Published : Jul 20, 2021, 4:03 PM IST

सिंधुदुर्ग - देवगड तारामुंबरी येथील समुद्र किनाऱ्यावर एक मच्छीमाराला चिकट पदार्थ आढळला. हा चिकट पदार्थ वनविभागाने ताब्यात घेतला आहे. हा पदार्थ व्हेल माशाची उलटी आहे का, हे तपासण्यासाठी वनविभागाने या पदार्थाचा काही भाग पुणे येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. उमाकांत कुबल असे मच्छीमाराचे नाव आहे. ते देवगड-शिवनगर येथे राहतात.

माहिती देताना परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र घुणकीकर आणि मच्छीमार

हेही वाचा -गडनदीला आला पूर, खोत जुवा, मसुरकर जुवा बेटावरील घरे पाण्याखाली जाण्याचा धोका

किनाऱ्यावर आढळला विशिष्ट पदार्थ

मासेमारी करण्यासाठी तारामुंबरी समुद्रकिनारी गेले असता मला स्मशानभूमीनजीकच्या किनाऱ्यावर एक विशिष्ट पदार्थ आढळला. हा पदार्थ कुत्रे खात होते. तो पदार्थ जवळून पाहिला असता तो पदार्थ चिकट स्वरुपाचा असल्याचे दिसून आले. अशा प्रकारचा पदार्थ मी प्रथमच किनाऱ्यावर पाहिला होता. त्यामुळे, त्या पदार्थाचे फोटो काढून मी माझे मित्र जे मुंबई येथे मत्स्य संशोधन संस्थेत काम करतात त्या स्वप्नील तांडेल यांना व्हॉट्सअॅपवर पाठविले. तांडेल यांनी फोटो पाहिल्यानंतर तो पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्याचे मला सांगितले. या उलटीला कोट्यवधींची किंमत आहे. या उलटीची तस्करी केली जाते. त्यामुळे याची माहिती वनविभागाला द्या, अशीही सूचनाही त्यांनी दिली. त्यानुसार तांडेल यांनीच कणकवली वनविभागाला याची माहिती देऊन माझा संपर्क क्रमांक दिला. त्यानंतर तो पदार्थ एका प्लास्टिकच्या बॅरलमध्ये भरून मी घरी आणला आणि वनविभागाच्या ताब्यात दिला, अशी माहिती मच्छीमार उमाकांत उर्फ कांतू विठ्ठल कुबल यांनी दिली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ कणकवली वनविभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र घुणकीकर, ठाकुरवाडी वनरक्षक रानबा बिक्कड, कणकवली वनरक्षक अनिल राख, लिपीक संतोष आंबेरकर हे कुबल यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर वनविभागाने स्थानिक नगरसेवक बापू जुवाटकर, पोलीस पाटील तन्वी खवळे यांच्यासमक्ष या पदार्थाचा पंचनामा केला. आणि हा उल्टी सदृश पदार्थ ताब्यात घेतला. ही नक्कीच देवमाशाची उल्टी आहे का, याचा तपास करण्यासाठी यातील काही भाग तपासणीसाठी पुणे येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे, अशी माहिती परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांनी दिली.

व्हेल माशाच्या उलटीची मोठ्या प्रमाणात होते तस्करी

अलीकडेच ठाणे वनविभागाने दोन ठिकाणच्या कारवाईत देवमाशाची उलटी जप्त केली होती. तसेच, या कारवाईत पाच संशयितांना ताब्यात घेतले होते. व्हेल माशाच्या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याने वनविभागाकडून देशभरात विविध ठिकाणी कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर देवगडमध्ये सापडलेल्या या उल्टीला महत्व प्राप्त झाले आहे. देवमाशाच्या उल्टीला अंबरग्रीस किंवा ऍमबिग्रीस संबोधले जाते आणि तो एक शुष्क पदार्थ आहे. जो केवळ ‘स्पर्म व्हेल’ प्रजातीतील व्हेलच्या पाचन तंत्रामध्ये आढळतो. सागरी शास्त्रज्ञांच्या मते स्पर्म व्हेलने स्क्विड आणि ऑक्टोपसचे प्रचंड प्रमाणात सेवन केल्यानंतर जेव्हा त्याचे अपचन होते, तेव्हा उलटी तयार होते. या पदार्थात दुर्मीळ घटक असतात. याला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

हेही वाचा -दरड कोसळल्याने सिंधुदुर्गातील भुईबावडा घाटात एकेरी वाहतूक

ABOUT THE AUTHOR

...view details