महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे विहीर खोदणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ - लॉकडाऊनमुळे विहीर खोदाई मजुरांचे हाल

सावंतवाडी बांदा येथील महामार्गालगत सध्या हे मजूर आपल्या झोपड्या करून राहतात. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, कर्नाटकातील संकेश्वर या भागातील हे मजूर आहेत.

labour
लॉकडाऊनमुळे विहीर खोदाई मजुरांवर उपासमारीची वेळ...

By

Published : Jun 5, 2020, 4:08 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात उन्हाळी हंगामात विहीर खोदाईच्या कामासाठी येणाऱ्या मजुरांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नाही, केलेल्या कामाचे पैसे मिळत नाहीत, अशा स्थितीत हे मजूर सध्या दिवस काढत आहेत.

सावंतवाडी बांदा येथील महामार्गालगत सध्या हे मजूर आपल्या झोपड्या करून राहतात. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, कर्नाटकातील संकेश्वर या भागातील हे मजूर आहेत. लॉकडाऊनमुळे विहिरींची कामे मिळेनात आणि सुरुवातीला केलेल्या कामाचे पैसेही कोणी देईनात, अशावेळी खायचे काय? हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

या मजुरांच्या मदतीला श्रमिक मुक्ती दलाचे कॉम्रेड संपत देसाई आणि सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे हे दोघे आलेत. त्यांनी या मजुरांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या आहेत. होळीचा सण झाला की आम्ही कोकणात येतो. विहिरींची काम करतो आणि पावसाच्या सुरुवातीला गावी जातो. यावर्षी काम नसल्याने खायचे काय? हा प्रश्न आहे. तसेच गावाकडे आमच्यापैकी अनेकांची घरे नाहीत, तर काहींची शेती नाही, अशी व्यथा आजरा पेरणोली येथील सुरज जाधव यांनी मांडली.

ABOUT THE AUTHOR

...view details