सिंधुदुर्ग -जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन मध्येच गुढी पाडवा सण साजरा करण्यासाठी कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी एक्स्प्रेसमधून शेकडो चाकरमानी सिंधुदुर्गातील विविध स्थानकावर दाखल झाले आहेत. यातील अनेक प्रवाशांनी कोरोना चाचणीचे प्रमाणपत्रही आणले नव्हते. तर दुपारी दोन वाजेपर्यंत कोरोना चाचणी प्रमाणपत्र तसेच प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याची यंत्रणा काही रेल्वे स्थानकावर नसल्याचे चित्र दिसत होते.
सिंधुदुर्ग : विकेंड लॉकडाऊनमध्येच गुडी पाडव्यासाठी रेल्वेने मोठ्या संख्येने दाखल झाले चाकरमानी - सिंधुदुर्ग कोरोना
जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन मध्येच गुढी पाडवा सण साजरा करण्यासाठी कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी एक्स्प्रेसमधून शेकडो चाकरमानी सिंधुदुर्गातील विविध स्थानकावर दाखल झाले आहेत. यातील अनेक प्रवाशांनी कोरोना चाचणीचे प्रमाणपत्रही आणले नव्हते. तर दुपारी दोन वाजेपर्यंत कोरोना चाचणी प्रमाणपत्र तसेच प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याची यंत्रणा काही रेल्वे स्थानकावर नसल्याचे चित्र दिसत होते.

एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल -
विकेंड लॉकडाऊन असल्याने रेल्वे स्थानकात आज ठराविक संख्येनेच रिक्षा होत्या. तर एसटी सेवा पूर्णतः बंद होती. त्यामुळे शहर आणि परिसरात आलेल्या चाकरमान्यांना भर उन्हात पायपीट करत घरी जावे लागले. तर लगतच्या गावातील प्रवाशांनी खासगी वाहने बोलावून घर गाठणे पसंत केले. राज्यात शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाउन असले तरी रेल्वेसेवा सुरू आहेत. त्यामुळे विविध एक्स्प्रेसमधून शेकडो चाकरमानी दाखल होत आहेत. जिल्हा प्रशासनाने सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांकडे आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आणणे सक्तीचे केले होते; मात्र असे प्रमाणपत्र अथवा रेल्वे स्थानकात आलेल्या प्रवाशांची नोंद ठेवण्याचीही सुविधा इथे दिसून येत नव्हती.