महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' कोरोनाबाधित व्यक्तीचे गाव कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित - Wayangani village news

वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी गावातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. हा रूग्ण राहत असलेला भाग कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी या भागाची पाहणी केली.

Collector K. Manjulakshmi
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

By

Published : May 7, 2020, 10:19 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त नसली तरी जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात खबरदारी घेत आहे. वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी गावातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. हा रूग्ण राहत असलेला भाग कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी या भागाची पाहणी केली. दरम्यान वायंगणी परिसरात आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details