सिंधुदुर्ग- जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. सिंधुदुर्गातील कुडाळ माणगाव येथील निसर्गाच्या कूशीत असलेला गारवेलीचा धबधबाही प्रवाहित झाला आहे. २० ते ३० फुटावरुन हा धबधबा कोसळत आहे. वर्षा पर्यटनास निसर्गाकडून मिळालेली सुंदर देणगी असलेला माणगावमधील गारवेळीचा हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे.
निसर्ग सौंदर्य बहरले..! सिंधुदुर्गात अनेक धबधबे प्रवाहित
सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगरातून वाहणाऱ्या या धबधब्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य बहरुन आले आहे. चारी बाजुंनी हिरवाईने नटलेल्या डोंगरामधून धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकही भेट देत आहेत.
धबधबा..
सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगरातून वाहणाऱ्या या धबधब्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य बहरुन आले आहे. चारी बाजुंनी हिरवाईने नटलेल्या डोंगरामधून धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकही भेट देत आहेत. परंतु, कोरोनामुळे म्हणावी तेवढी पर्यटक संख्या या ठिकाणी दिसत नाही. जिल्ह्यात सर्वत्र वर्षा पर्यटनाला सध्या ब्रेक लागलेला असून, यामुळे व्यावसायिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.