सिंधुदुर्ग - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कणकवलीतील भिरवंडे ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून त्याठिकाणी शिवसेनेने भगवा फडकवला आहे. निकाल हाती आल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. जिल्ह्यात ६६ ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरू आहे.
सिंधुदुर्गात मतमोजणीला सुरुवात झाली आहे ६६ ग्रामपंचायतींची मतमोजणी -
१५ जानेवारीला जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. त्यांची आज मतमोजणीला सुरू आहे.जिल्ह्यात एकूण ७० ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ४ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या. ६६ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ४९४ जागांसाठी १ हजार ८७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. २०७ मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज तहसीलदार कार्यालयांमध्ये मतमोजणी होत आहे.
अटीतटीच्या लढती -
६०० पैकी १०६ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे ४९४ जागांसाठी प्रत्यक्षात १ हजार ८७ उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी अटीतटीची लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले. यातील अनेक ठिकाणी एकास एक याप्रमाणे भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांमुळे तिरंगी लढती झाल्या आहेत.
भिरवंडे ग्रामपंचायत शिवसेनेकडे -
कणकवली तालुक्यातील भिरंवडे ग्रामपंचायतीचा पहिला निकाल हाती आला आहे. भिरवंडे ग्रामपंचायत शिवसेनेकडे आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकूण सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतचे चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते. त्या सदस्यांवर शिवसेनेने दावा केला होता. उर्वरित ३ सदस्यांसाठी निवडणूक झाली होती. हे सदस्य देखील शिवसेनेचे आहेत. त्यामुळे भाजपाला व नितेश राणेंना जिल्ह्यात पहिला धक्का बसला आहे.