सिंधुदुर्ग Vinayak Raut on Election : आगामी काळात अयोध्येतील राम मंदिरावरुन राजकारण रंगू लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपमधील काही नेते राम मंदिर कधी पूर्ण होतंय याची वाट पाहत असून, जोपर्यंत आयोध्येतील राम मंदिर पूर्ण होत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुका होणार नाहीत, तसंच महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचं भाकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलंय.
महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका लागणार : सध्या महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका लागण्याची दाट शक्यता असून लोकसभेच्या निवडणुका मात्र वेळच्यावेळी होतील असं खासदार विनायक राऊत म्हणाले. तसंच राम मंदिराचा जर्णोद्धार झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुकांसमोर जाण्याचं धारिष्ट भाजप सरकार करणार नाही. मागच्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात प्रशासन कारभार चालवतय, इथं लोकप्रतिनिधीना स्थान नाही, अशा शब्दात विनायक राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली. मात्र, महाराष्ट्रासहित अनेक राज्यातील विधानसभा निवडणुका वन नेशन वन इलेक्शन याच सुत्राखाली येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचंही विनायक राऊत म्हणाले.