सिंधुदुर्ग -मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक बदल पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे गट, शिवसेना यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर पुण्यात शिवसैनिकांकडून हल्ला झाला होता. यावरून शिवसेनेवर टीका करण्यात आली होती. आता निलेश राणे ( Nilesh Rane ) यांनी सेना नेते विनायक राऊत यांच्यावर ( Nilesh Rane criticizes Vinayak Raut ) निशाणा साधला आहे.
दहावीमध्ये दोनदा नापास -निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्वीट ( Nilesh Rane Tweet ) करत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत ( MP Arvind Sawant ), विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. विनायक राऊत दहावी दोनदा नापास आहे. खासदार विनायक राऊत कायदे तज्ञ कधीपासून झाले?, असा खोचक सवला त्यांनी केला आहे. राणे ट्वीटमध्ये म्हणतात, सामंत यांच्यावरील हल्लासंदर्भात विनायक राऊत, अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया ऐकली. या प्रकरणात विनायक राऊत यांच्यासारखे दोन वेळा दहावी नापास झालेले नेते कायदा शिकवू लागले तर, महाराष्ट्र संकटात येईल. दहावीमध्ये दोनदा नापास झालेल्या व्यक्तीचा कायद्याशी काही संबंध आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.