सिंधुदुर्ग - नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू असताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना टोला लगावला आहे. बुडत्याला काढीचा आधार असं म्हणत विनायक राऊत यांची नारायण राणेंना कोपरखळी मारली आहे. तसेच नाॅन मॅट्रीक माणसाला केंद्रात मंत्रीपद देण्याची वेळ आली तर ते सिंधुदुर्गचे दुर्दैव असेल राऊत म्हणाले
'नाॅन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रीपद देण्याची वेळ आली तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव'
भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे सारख्या एका नाॅन मॅट्रीक माणसाला केंद्रात मंत्रीपद देण्याची वेळ आली तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल, अशी थेट टीका करत विनायक राऊत यांनी नारायण राणेंना डिवचलं आहे.
Vinayak Raut criticizes Narayan Rane
बुडत्याला काढीचा आधार -
एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे सारख्या एका नाॅन मॅट्रीक माणसाला केंद्रात मंत्रीपद देण्याची वेळ आली तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल, अशी थेट टीका करत विनायक राऊत यांनी नारायण राणेंना डिवचलं आहे. तसेच बुडत्याला काढीचा आधार असं म्हणत राणेंना कोपरखळी लगावली आहे.
Last Updated : Feb 9, 2021, 4:33 PM IST