सिंधुदुर्ग– गणेश चतुर्थी कालावधीत शहरात मुंबईमधून चाकरमानी मोठ्या प्रमाणात शहरात दाखल होतात. सध्याही लोकांचे येणे सुरुच असल्याने किमान गणेश चतुर्थी कालावधीपर्यंत नगरपरिषद हद्दीतील शाळा संस्थात्मक विलगीकरणासाठी वापरात ठेवण्यात याव्यात, असा निर्णय वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सभेत एकमताने घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील शाळा संस्थात्मक विलगीकरणसाठी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी काही शाळा सुरू करण्यासाठी ताब्यात देण्याची व्यवस्थापन समित्यांकडून विनंती करण्यात येत आहे. परंतु गणेश चतुर्थी कालावधीत मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांचे लोंढे शहरात येणार आहेत. त्यामुळे अशा येणाऱ्या चाकरमान्यांना विलगीकरण कक्षाची कमतरता भासणार आहे. त्यामुळे गणेश चतुर्थी कालावधीपर्यंत तरी शहरातील शाळा विलगिकरण कक्षासाठी वापरण्यात याव्यात, असा यावेळी निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी वैभव साबळे आणि नगरसेवक उपस्थित होते.
गणेश चतुर्थीपर्यंत वेंगुर्ल्यातील शाळा विलगीकरणाकरता राखीव - schools for quantitative peoples
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील शाळा संस्थात्मक विलगीकरणसाठी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी काही शाळा सुरू करण्यासाठी ताब्यात देण्याची व्यवस्थापन समित्यांकडून विनंती करण्यात येत आहे.
संग्रहित
दरम्यान, एकीकडे विद्यार्थ्यांच्या शाळा आणि विलगीकरणासाठी जागांची लागणारी गरज यामधून मार्ग काढणे, हे प्रशासनासाठी आव्हान ठरणार आहे.