सिंधुदुर्ग- होडावडा-तळवडे पूल पाण्याखाली गेल्याने वेंगुर्ले-(होडावडा मार्गे) सावंतवाडी हा राज्य मार्ग काही काळ ठप्प झाला होता. त्यामुळे यामार्गावरील वाहतूक मातोंडमार्गे वळवण्यात आली. मुसळधार पावसामुळे तळवडे पंचक्रोशीत पूरपरिस्थिती निर्माण झाली.
होडावडा-तळवडे पूल पाण्याखाली गेल्याने वेंगुर्ला-सावंतवाडी मार्गावरील वाहतूक ठप्प - राज्य मार्ग
जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याचाच फटका वेंगुर्ले सावंतवाडी मार्गावरील वाहतुकीला बसला आहे.
जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याचाच फटका वेंगुर्ले सावंतवाडी मार्गावरील वाहतुकीला बसला. होडावडा-तळवडे पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. त्यामुळे मातोंडमार्गे पर्यायी मार्गावरुन वाहतूक वळवण्यात आली. या मार्गावरून जाणाऱ्या एसटी बस फेऱ्याही पर्यायी मार्गानेच वळवण्यात आल्या. परिणामी प्रवासी विद्यार्थी आणि नागरिकांचे हाल झाले.
सकाळी १० वाजल्यानंतर पाणी ओसरल्यावर यामार्गावरून वाहतूक पुन्हा सुरू झाली. मात्र, तळवडे पंचक्रोशीत दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. परिणामी शेतातील भाताची रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.