सिंधुदुर्ग- महाराष्ट्रातून गोव्यात जाणार्या वाहनांची गोवा नाक्यावर तर गोव्यातून महाराष्ट्रात येणार्या वाहनांची तपासणी महाराष्ट्र नाक्यावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एका बाजूला एकाचवेळी तपासणी करून वाहने सोडण्यात येणार आहेत. राज्याच्या सीमेवर दोन्ही बाजूला वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र-गोवा सीमेवर एकदाच होणार वाहनांची तपासणी - Corona virus
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व गोवा प्रधान सचिव पुनीत गोयल यांच्यात झालेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही चेकपोस्टवर तपासणीमुळे होणारा विलंब टळणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व गोवा प्रधान सचिव पुनीत गोयल यांच्यात झालेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही चेकपोस्टवर तपासणीमुळे होणारा विलंब टळणार आहे.
महाराष्ट्र-गोवा सीमेवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक तपासणी करण्यात येत होती. त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूंनी रांगा लागत होत्या. मात्र, आता या नवीन निर्णयामुळे वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण येणार आहे. महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवर दोन्ही बाजूला तपासणी करण्यासाठी वाहने अनेक तास थांबत होती. त्यामुळे या वाहनातील वाहनांचे चालक आणि क्लिनर जवळच्या बांदा बाजारपेठेत खरेदीसाठी जात होते. तसेच ही वाहने रेडझोन मधून येत असल्याने या लोकांपासून संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. यानंतर दोन्ही राज्याच्या स्थानिक प्रशासनाने एकत्र येऊन चर्चा केली आणि यावर तोडगा काढला.