महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कणकवलीत अज्ञाताने ३ दुचाकी जाळल्या, परिसरात खळबळ - कणकवली दुचाकींना आग न्यूज

कणकवली शहरात यापूर्वीही पूर्ववैमनस्यातून दुचाकी आणि वाहनांना आग लावण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे आजच्या अग्नी तांडवाने कणकवलीकरांमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मात्र, ही आग लागली की लावली गेली, याचा कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत.

सिंधुदुर्ग कणकवली दुचाकी जाळल्या न्यूज
सिंधुदुर्ग कणकवली दुचाकी जाळल्या न्यूज

By

Published : Dec 9, 2020, 11:59 AM IST

Updated : Dec 9, 2020, 12:28 PM IST

सिंधुदुर्ग - कणकवली शहरातील रवळनाथ मंदिरानजिक संजय ढेकणे यांच्या घराजवळ रस्त्यालगत उभ्या केलेल्या ३ दुचाकींना बुधवारी (ता. ९ डिसेंबर) पहाटे ३ च्या दरम्यान आग लावल्याची घटना घडली. यात २ मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत. तर, स्थनिकांच्या प्रसंगसावधानामुळे एक दुचाकी वाचवण्यात यश आले आहे.

कणकवलीत अज्ञाताने ३ दुचाकी जाळल्या, परिसरात खळबळ

कणकवली शहरात राहणाऱ्या कळसुली हायस्कूलचे शिक्षक अमर पवार यांची डिस्कव्हर मोटरसायकल, मोहिते यांची प्लेझर आणि पाताडे यांची यामाहा पसिनो अशा दुचाकी ढेकणे यांच्या घराजवळ उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. या दुचाकींना आग लागली आहे. दरम्यान, ही लागली की लावली गेली, याबाबत उलट सुलट चर्चा होत आहे. गाड्या उभ्या असलेल्या घरासमोरील रहिवासी निमनकर यांच्या घराला बाहेरून कडी घालण्यात अली होती. त्यामुळे गाड्यांना आग लावतेवेळी कोणी बाहेर येऊन आपला प्लॅन फसू नये, या उद्देशाने कडी लावली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा -पुण्यात दोन वर्षानंतर पुन्हा पेट्रोलचे दर नव्वदीत; नागरिकांच्या खिशाला कात्री

एक दुचाकी वाचवण्यात यश

शहरातील मधलीवाडी रवळनाथ मंदिरानजिक नागवे रोड लगत ग्रामस्थ आपली वाहने उभी करून ठेवतात. येथील एकाने घरापर्यंत जाणारी वाट बंद केली असल्यामुळे येथील लोक नाईलाजाने गाड्या रस्त्यालगत उभ्या करतात. दरम्यान, गाड्यांना लागलेली आग पाहून ढेकणे यांना जाग आली. त्यांनी अन्य लोकांना जागे करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. ढेकणे यांनी डिस्कव्हर मोटरसायकल बाजूला केली. त्यामुळे ती वाचली आहे. मात्र, अन्य दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस पहाटेच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबत पाहणी करून पंचनामा केला आहे.

कणकवलीत यापूर्वी घडल्या आहेत घटना

कणकवली शहरात यापूर्वीही पूर्ववैमनस्यातून दुचाकी आणि वाहनांना आग लावण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे आजच्या अग्नी तांडवाने कणकवलीकरांमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मात्र, ही आग लागली की लावली गेली, याचा कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा -वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाला कोरोनाचा फटका; गाळे क्वारंटाइन सेंटरसाठी राखीव

Last Updated : Dec 9, 2020, 12:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details