सिंधुदुर्ग - नारायण राणेंचे होमपीच असलेल्या कणकवलीत आज उद्धव ठाकरेंची सभा होत आहे. संध्याकाळी ५ वाजता सभेला सुरुवात होणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख कशी तोफ डागतात याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सिंधुदुर्ग : राणेंच्या होमपीचवर आज उद्धव ठाकरे करणार बॅटींग - rally
सर्वत्र लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच कोकणात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
सर्वत्र लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच कोकणात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राणे विरुध्द शिवसेना अशी मुख्य लढत आहे. दोघांसाठीही ही लढत वर्चस्वाची लढाई ठरणार आहे.
महायुतीची ही सभा भव्य होण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंसह भाजपचे विनोद तावडे तसेच अन्य नेतेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. राणेंनी प्रचार दरम्यान वेळोवेळी शिवसेनेला टार्गेट केलेले आहे. शिवसेनेवर प्रचार सभांमधून चांगलेच तोंडसुख देखील घेतले होते.