सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. येत्या 23 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या चिपी विमानतळाचे उद्धाटन करण्यात येणार होते. मात्र विमानसेवा सुरू करण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, यामुळे उद्घाटन पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांच्यासह विनायक राऊत यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी किंवा मी कोणतीही परवानगी दिली नाही
चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. केंद्र सरकारने चिपी विमानतळ सुरू करण्यास कुठलीही आडकाठी केलेली नाही. मात्र 23 जानेवारीला विमानतळ सुरू करण्याची कोणतीही परवानगी मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री म्हणून मी दिलेली नाही, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
संबंधित आय. आर. बी. कंपनीने याबाबतची माहिती दिली आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणार होते. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र हा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे.
हेही वाचा -सिरमचे ‘कोविशिल्ड’ व्हॅक्सिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल, शनिवारी लसीकरण
हेही वाचा -सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६६ ग्रामपंचायतींसाठी आतापर्यंत ५२ टक्के मतदान