महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोविड-१९ लॅबवरुन राजकारण करणे चुकीचे; उदय सामंतांची प्रवीण दरेकरांवर टीका - उदय सामंत प्रवीण दरेकर टीका

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळ जिल्ह्यात कोरोना उपाययोजनांचा आढावा घेत आहे. प्रवीण दरेकरांच्या शिष्टमंडळात असलेले सर्व आमदार रेड झोनमधून आले आहेत. पालकमंत्री म्हणून मी त्यांना सीमेवरच अडवले असते मात्र, त्यांच्या पदाचा विचार करुन तसे केले नाही. दरेकर मात्र, जिल्ह्यात राजकारण करत आहेत, असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

Uday Samant
उदय सामंत

By

Published : May 22, 2020, 12:06 PM IST

सिंधुदुर्ग - विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळ जिल्ह्यात कोरोना उपाययोजनांचा आढावा घेत आहे. हे लोक कोविड-१९ लॅबवरून राजकारण करत आहेत. पडवे मेडिकल कॉलेजमधील लॅब ही क्लिनिकल लॅब आहे. त्याठिकाणी कोविड तपासणी करण्यासाठी लागणाऱ्या मशनरी नाहीत. याठिकाणी सरकारसोबत करारकरून लॅब चालवण्यासाठी कॉलेज प्रशासन तयार असेल तर आम्ही देखील तयार आहोत. मात्र, आमदारांना खासगी कॉलेजला पैसे देता येत नाहीत, हे माहीत असतानाही दरेकर जनतेची दिशाभूल करत असल्याचा, आरोप पालकमंत्री उदय सामंत यांनी केला.

कोविड-१९ लॅबवरुन राजकारण करणे चुकीचे

कणकवली विजय भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते, अतुल रावराणे, सुशांत नाईक आदी उपस्थित होते. प्रवीण दरेकरांच्या शिष्टमंडळात असलेले सर्व आमदार रेड झोनमधून आले आहेत. पालकमंत्री म्हणून मी त्यांना सीमेवरच अडवले असते मात्र, त्यांच्या पदाचा विचार करुन तसे केले नाही, असेही उदय सामंत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details