सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांना तपासणी करण्यासाठी एकाच वाहनातून घेऊन जाण्यात आले होते. यानंतर यातील मुंबईहून परतलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशात त्यांच्यासोबत दाटीवाटीने एकाच गाडीतून तपासणीसाठी गेलेल्या सावंतवाडीतील 5 जणांची झोप उडाली आहे.
एकाच वाहनातून तपासणीसाठी नेले कोरोना संशयित, दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्वांची धाकधूक वाढली
जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांना तपासणी करण्यासाठी एकाच वाहनातून घेऊन जाण्यात आले होते. यानंतर यातील मुंबईहून परतलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशात त्यांच्यासोबत दाटीवाटीने एकाच गाडीतून तपासणीसाठी गेलेल्या सावंतवाडीतील 5 जणांची झोप उडाली आहे.
एकाच वाहनातून तपासणीसाठी नेले कोरोना संशयित
जिल्हा रुग्णालयात तपासणी झाल्यानंतर या सर्वांना कुडाळपर्यंत एकाच वाहनातून आणण्यात आल्याचा आरोप सावंतवाडीतील नागरिकांनी केला आहे. अशात या बेजबाबदारपणामुळे आम्हाला काही झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल यातील एका तरुणाने केला आहे .
Last Updated : May 7, 2020, 10:57 AM IST