सिंधुदुर्ग -दोडामार्ग तिलारी खोऱ्यात टस्कर हत्तीची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी तीन व्यक्तींचा पाठलाग केल्याची घटना ताजी असतानाच आता टस्कर केर गावातील रस्त्यावर गावकऱ्यांना दिसला.
दोडामार्ग तिलारी खोऱ्यात टस्कर हत्तीची दहशत
दोडामार्ग तिलारी खोऱ्यात टस्कर हत्तीची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी तीन व्यक्तींचा पाठलाग केल्याची घटना ताजी असतानाच आता टस्कर केर गावातील रस्त्यावर गावकऱ्यांच्या नजरेस पडला.
दोडामार्ग तिलारी खोऱ्यात टस्कर हत्तीची दहशत
भरदिवसा गावात जाणाऱ्या रस्त्यावर टस्कर हत्ती फिरत असल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. केर-भेकुर्ली रस्त्यावर सरपंच मिनल देसाई यांचे पती मोहन देसाई यांनी भरदिवसा टस्कराचा थरार अनुभवला होता. येथील भात शेती, बागायतीच मोठं नुकसान हत्तीने केल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. वन विभागाने याकडे लक्ष देऊन खबरदारीचे उपाय करावे, अशी मागणी शेतकरी करत आहे. केर गावात फिरत असताना हा हत्ती कॅमेऱ्यात कैद झाला आहे.