#लॉकडाऊन महाराष्ट्र : पर्यटन व्यावसायिकांसमोर कर्जबाजारी होण्याची चिंता
सिंधुदुर्गमध्ये मच्छिमार व्यवसायातील अनिश्चितता लक्षात घेता अनेक तरुणांनी पर्यटन व्यवसायात गुंतवणूक केली. मात्र, तोही व्यवसाय आता अडचणीत आला आहे. तसेच अनेक तरुणांसमोर सध्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे, याची चिंता आहे.
सिंधुदुर्ग -जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांवर सध्या कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. आधी पश्चिम महाराष्ट्रात आलेला पूर आणि आता कोरोनाच्या संकटामुळे येथील पर्यटन व्यवसाय पुर्णतः अडचणीत आला आहे. लाखो रुपये गुंतवणूक करून स्कुबा ड्रायव्हिंग सारखा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना कर्जाचा हप्ता कसा भरावा, याची काळजी सतावत आहे.
जिल्ह्यातील मालवण तालुक्यात स्कुबा ड्रायव्हिंगचे 50 गृप आहेत. एका गृपची साधारण 50 लाखापर्यंत गुंतवणूक आहे. मालवणमध्ये दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून आपला रोजगार मिळवणारे हे लोक मुळात मच्छिमार आहेत. मच्छिमार व्यवसायातील अनिश्चितता लक्षात घेता अनेक तरुणांनी पर्यटन व्यवसायात गुंतवणूक केली. मात्र, तोही व्यवसाय आता अडचणीत आला आहे. तसेच अनेक तरुणांसमोर सध्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे, याची चिंता आहे.