पणजी- गोव्यातील मुरगाव मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघावर गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. मात्र यावेळची परिस्थिती वेगळी आहे. या मतदारसंघांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेसचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये तर भाजपाचे अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे सद्यस्थितीला कोणाचे पारडे जड आहे हे सांगता येत नाही.
मतदार संघाची रचना
गोव्यातील मुरगाव तालुक्यात हा मुरगाव मतदारसंघ येतो. या मतदारसंघात मतदारांची संख्या २९ हजार इतकी आहे. यामध्ये १४ हजार पुरुष मतदार संघ तर १५ हजार महिला मतदारांची संख्या आहे.
फरक पडत नाही पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षांतर केल्यामुळे दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते मात्र कुणी गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही असा दावा करीत आहेत. वास्तविक यामुळे दोन्ही पक्षांनी आयत्यावेळेस आपली प्रचाराची रणनिती बदलली आहे. मुरगावमध्ये यंदा चुरसमोरगाव मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार आणि गेल्या दोन विधानसभा मधील आमदार मिलिंद नाईक हे रिंगणात उतरले आहेत त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर यांनी आव्हान दिले आहे. मिलिंद नाईक हॅट्रिक साधतात की संकल्प आमोणकर त्यांना पराभवाची चव चाखायला लावतात याबाबत आता उत्सुकता ताणली गेली आहे. या मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे जयेश शेटगावकर आणि आपचे परशुराम सोनुर्लेकर निवडणूक लढवत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख महंमद, आरजीचे परेश तोरस्कर आणि निलेश नावेलकर, इनायतुला शेख हे दोन अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. एकूण आठ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या या मतदारसंघांमध्ये यंदा कोण निवडणूक जिंकणार याबाबत उत्सुकता आहे. याचे कारण या मतदारसंघातील विकासकामे झाली नसल्याचा काँग्रेसचा आरोप आणि पर्यावरणाचा ऱ्हास, बेरोजरगारी इतर मुद्दयामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे राजकीय विश्लेषक किशोर नाईक सांगतात.गेल्या निवडणुकीत अमोणकर यांना साथ देणारे निलेश नावेलकर हे स्वतः उमेदवार म्हणून उभे आहेत, तर शेखर खडपकर यांनीही मिलिंद नाईक यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेस पुढील अडचणींमध्ये काही अंशी वाढ झाल्याचे दिसते, मात्र असे असले तरी या मतदारसंघात काटे की टक्कर होणार हे नक्की.