महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभरात 7 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या 24 - Sindhudurg coronavirus cases

जिल्ह्यात यापूर्वी आढळलेल्या 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णापैकी 7 रुग्ण बरे झाले आहेत तर 10 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू आहेत.

Sindhudurg District General Hospital
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालय

By

Published : May 28, 2020, 5:47 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आज आणखी 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 24वर गेली आहे.

कणकवली तालुका 1, कुडाळ तालुका 2, वैभववाडी तालुका 2 तर सावंतवाडी तालुक्यात 2 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात यापूर्वी आढळलेल्या 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णापैकी 7 रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त झाले आहेत तर 10 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, आता नवीन 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, शिवडाव येथील रुग्ण हा पणदूर येथे सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहे.

तालुक्यानुसार आढळलेले रुग्ण -

कणकवली तालुक्यातील शिवडाव येथील 1 रुग्ण, वैभववाडी तालुक्यातील तिरवडे 1 रुग्ण व उंबर्डे 1 रुग्ण , कुडाळ पणदूर येथील 2 रुग्ण आढळले तर सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे मधील 2 रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details