महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्ग : चंदगड काँझर्वेशनमध्ये 'काळ्या बिबट्या' नंतर आता 'पट्टेरी वाघा'चे दर्शन - चंदगड काँझर्वेशनमध्ये वाघ

सावंतवाडी वनविभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये एका पाळीव जनावराची केलेली शिकार खाताना वाघाचे छायाचित्र टिपले गेले आहे. चंदगड काँझर्वेशनमध्ये काही दिवसांपूर्वी एक वाघ शिकार करताना दिसून आला होता.

chandgad conservation tiger news
chandgad conservation tiger news

By

Published : Nov 28, 2021, 11:54 PM IST

सिंधुदुर्ग -कुडाळ तालुक्यात 'काळा बिबट्या' सापडल्यानंतर आता जिल्ह्यात 'वाघा'चे दर्शनही घडले आहे. सावंतवाडी वनविभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये एका पाळीव जनावराची केलेली शिकार खाताना वाघाचे छायाचित्र टिपले गेले आहे. चंदगड काँझर्वेशनमध्ये काही दिवसांपूर्वी एक वाघ शिकार करताना दिसून आला होता. त्यानंतर काही दिवसातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पट्टेरी वाघ वनविभागाच्या कॅमेरा दिसून आल्यामुळे या भागातील वाघाचे अस्तित्व गडद झाले आहे.

काही दिवसांपूर्वी काळा बिबट्या' दिसला -

जिल्ह्यात नुकताच कुडाळ तालुक्यात दुर्मिळ प्रजातीतील 'काळा बिबट्या' दिसून आला आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील जंगल क्षेत्रामध्ये 'पट्टेरी वाघा'चा वावर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हा जैवविविधतेने संपन्न असल्याचे दिसून येते. वाघ हा प्राणी परिसंस्थेच्या सर्वोच्च स्थानावरील वन्य प्राणी असून तो परीपूर्ण जंगलाचे प्रतिक म्हणूनही पाहिला जातो.

जिल्ह्याच्या वन वैभवात झाली वाढ -

जिल्ह्यातील या वैनवैभवाचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांची वन्यप्राण्यांकडून शिकार झाल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा. जेणे करुन आपण शासनामार्फत नमुद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देता येईल. तसेच आपला हा समृद्ध वन वारसा जोपाण्यासाठी सावंतवाडी वन विभागासह आपण सर्व नागरिकही कटिबद्ध राहुया, असे आवाहन सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस.डी.नारनवर यांनी केले आहे.

हेही वाचा -'Omicron Variant'ची दहशत, टाळेबंदी नको असेल तर नियम पाळा - मुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details