महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक! सिंधुदुर्गमध्ये आणखी 3 जणांना डिस्चार्ज, आतापर्यंत 114 जण कोरोनामुक्त - सिंधुदुर्ग कोरोना न्यूज अपडेट

जिल्ह्यात कोरोनाच्या आणखी 3 रुग्णांना उपचाराअंती बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत 114 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आता 39 सक्रीय रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 3 जण कोरोनामुक्त,
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 3 जण कोरोनामुक्त,

By

Published : Jun 19, 2020, 5:53 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आणखी 3 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 114 झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 39 सक्रीय रुग्ण असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले.

जिल्ह्याची स्थिती -

पाठविण्यात आलेले एकूण नमुने - 3,124
अहवाल प्राप्त झालेले नमुने - 3,098
आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने - 158
निगेटिव्ह आलेले नमुने - 2,840
अहवाल प्राप्त न झालेले नमुने - 26
सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण - 39
इतर जिल्हे व इतर राज्यातील रुग्ण - 1 (मुंबई)
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या - 4
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण - 114
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण - 57

डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल - 6 बाधित,19 संभाव्य
डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर - 30 बाधित, 1 संभाव्य
कोव्हीड केअर सेंटर - 3 बाधित, 0 संभाव्य

आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती - 4,193
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती - 14,893
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती - 87
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती - 12,810
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती - 1,996
दि. 2 मे 2020 रोजी पासून आतापर्यंत जिल्ह्यात आलेल्या व्यक्ती - 102,383

ABOUT THE AUTHOR

...view details