सिंधुदुर्ग - गोव्यातील नरकासुर उत्सव हा येथील संस्कृतीचा आणि पर्यटनातील महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र यंदा पणजी शहरातील आकर्षण असलेले भव्यदिव्य नरकासुर पहायला मिळणार नाहीत. पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी यावर्षी कोरोनामुळे या नरकासुराच्या भव्यदिव्य देखाव्यांवर बंदी घातली आहे.
पणजीत यंदा नरकासुराच्या भव्यदिव्य देखाव्यांवर बंदी, महापौर उदय मडकईकर यांचा निर्णय - महापौर उदय मडकईकर
यंदा पणजी शहरातील आकर्षण असलेले भव्यदिव्य नरकासुर पहायला मिळणार नाहीत. पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी यावर्षी कोरोनामुळे या नरकासुराच्या देखाव्यांवर बंदी घातली आहे.
![पणजीत यंदा नरकासुराच्या भव्यदिव्य देखाव्यांवर बंदी, महापौर उदय मडकईकर यांचा निर्णय Diwali celebration](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9260746-432-9260746-1603285493109.jpg)
गोव्याची राजधानी असलेल्या पणजीत दिवाळीच्या पूर्वसंधेला दिसणारे नेत्रदीपक आणि भव्य असे हालते नरकासुर प्रतिमा देखावे हे एक आकर्षक असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा या उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, पूर्वपरवानगीने काही पारंपरिक ठिकाणी पाच फूटांपर्यंत नरकासुर उभारण्यास परवानगी असेल. चतुर्थीच्या काळात कोविडचे संकट वाढले होते, मात्र ते आता अटोक्यात आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून आम्ही यावर्षी या उत्सवावर बंधने आणल्याचे महापौर मडकईकर यांनी सांगितले.
महापौर मडकईकर म्हणाले की, जागतिक स्वरुपाचे हे संकट आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. शहरातील नरकासुर हे सर्वांसाठी आकर्षण असते. त्यामुळे ते पाहण्यासाठी गर्दी होते, ती टाळण्यासाठी यावर्षी नरकासुर प्रतिमा उभारण्याला मनाई करण्याचा निर्णय पालिकेनेघेतला आहे. ज्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीचा विधी होतो, केवळ अशाच ठिकाणी सर्व खबरदारी घेऊन नरकासुर उभारणीला परवानगी देण्यात आली आहे.