महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेश मूर्तीशाळेत मूर्तींवर फिरवला जातोय शेवटचा हात, लाॅकडाऊनची झळ बसल्याने मूर्तीकार चिंतेत - last hand is turned on the idols,

कोरोनाच्या अनुषंगाने सुरू केलेल्या लॉकडाऊनचा परिणाम गणेश मूर्ती बनवण्याच्या व्यवसायावरही झाला असून यंदा शाडू माती तसेच रंग साहित्याच्या किंमतीत किमान १५ टक्के वाढ झाल्याची माहिती येथील मूर्तीकारांनी दिली आहे. बहुतेक शांळामध्ये गणेशाच्या मूर्ती बनवून पूर्ण झाल्या असून या मूर्तीना रंग देण्याचे काम जोरदार सुरू आहे.

last hand is turned on the idols,
मुर्त्यांवर फिरवला जातोय शेवटचा हात,

By

Published : Aug 20, 2020, 2:21 PM IST

सिंधुदुर्ग- गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आला असताना गणपती चित्र शाळेत मूर्तीकारांची लगबग सुरू आहे. गेले महिनाभर मूर्ती घडवण्याचे काम करत असणारे मूर्तीकार बाप्पांवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत. तळकोकणात शाडूमातीच्या पर्यावरणपूरक अशा मूर्ती जास्त प्रमाणात बनवल्या जातात, तर अनेक रंगांनी रंगवलेल्या सूबक मूर्तींना जास्त मागणी असते. यंदा कोरोनाच सावट असल्यामुळे गणपतीच्या मूर्तींची उंची कमी करण्यात आली आहे. तसेच गणपतीला नेण्यासाठी लोकांची एकत्र गर्दी होऊ नये यासाठी दोन दिवस अगोदरच पूर्ण रंगकाम करून मूर्तीं तयार ठेवण्यात येत आहेत. दरम्यान कोरोनाचा फटका कोकणातील या मूर्तिकारांनाही बसला आहे.

गणेशोत्सव नजिक आल्याने परिसरातील मूर्तीशाळांमधील लगबग वाढली असून गणेश मूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सुरू केलेल्या लॉकडाऊनचे परिणाम या व्यवसायावरही झाले असून यंदा शाडू माती तसेच रंग साहित्याच्या किंमतीत किमान १५ टक्के वाढ झाल्याची माहिती येथील मूर्तीकारांनी दिली आहे. बहुतेक शांळामध्ये गणेशाच्या मूर्ती बनवून पूर्ण झाल्या असून या मूर्तीना रंग देण्याचे काम जोरदार सुरू आहे.

गणेशोत्सवाला अवघे काही तास असल्याने उर्वरित काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी येथील कारागिर रात्रंदिवस मेहनत करत आहेत. ओरोस खुर्द येथील तुकाराम मेस्त्री, अनंत मेस्त्री व दिवाकर मेस्त्री हे गेल्या कित्येक वर्षांपासून गावात गणेश मूर्तीशाळा चालवत आहेत. मेस्त्री बंधूनी या वर्षीपासून कडावल येथेही दुसरी मूर्तीशाळा नव्याने सुरू केली आहे. या शाळेत अनेक सुबक गणेश मूर्ती विक्रीस उपलब्ध आहेत. मूर्तींची कमीतकमी किंमत एक हजार रुपये ठेवली आहे. गणेश मूर्ती बनविणे हे फार जबाबदारीचे काम आहे. ते वेळेत पूर्ण होणे गरजेचे असल्याने संबंधित मूर्तीकारांना वेळेचे भान ठेवावे लागते. साहित्याच्या सतत वाढणाऱ्या किंमतीमुळे मूर्तींची किंमतही मूर्तीकारांना नाईलाजास्तव वाढवावी लागत आहे. लॉकडाउनमुळे यंदा मूर्तीकामाच्या रंगसाहित्यात सुमारे १५ टक्के वाढ झाली आहे. शाडू मातीच्या ४० किलोच्या गोणीची किंमत गतसाली २५० रुपये होती. ती यंदा ३०० रुपयांवर पोहचली आहे. अशी माहिती मूर्ती व्यावसायिकांकडून मिळते.

ABOUT THE AUTHOR

...view details