सिंधुदुर्ग- मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रात महसूल पथकाने धडक कारवाई केली. याठिकाणी अनधिकृत पद्धतीने सक्शन पंप लावून वाळू उपसा व वाहतूक केली जात होती. यावेळी सक्शन पंप, लोखंडी पाईप व होडीला डिझेल ओतून आग लावण्यात आली. तहसीलदार अजय पाटणे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
कालावल खाडीपात्रात सक्शन बोट पेटवली; अवैध वाळू वाहतुकीसाठी केला जात होता वापर - Kalaval creek sindhudurg
कोईल गावात गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री वाळू उत्खनन आणि वाहतूक करण्यासाठी सक्शन पंप आणल्याचे परिसरातील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. कोणतीही परवानगी नसताना खाडीपात्रात सक्शन पंप पाईप लावून वाळू उपसा होत असल्याने ग्रामस्थ अधिकच संतापले. याप्रकरणी काही ग्रामस्थांनी एकत्र येत थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.
कोईल गावात गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री वाळू उत्खनन आणि वाहतूक करण्यासाठी सक्शन पंप आणल्याचे परिसरातील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. कोणतीही परवानगी नसताना खाडीपात्रात सक्शन पंप पाईप लावून वाळू उपसा होत असल्याने ग्रामस्थ अधिकच संतापले. याप्रकरणी काही ग्रामस्थांनी एकत्र येत थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान, अनधिकृत सक्शन पंप व वाळू उपसा प्रकरणी पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार अजय पाटणे यांनी मंडळ अधिकारी, तलाठी आणि महसूल पथकाला दिले.
शुक्रवारी दुपारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी के. एच. पोकळे, तलाठी पी. डी. मसुरकर, टी. जी. गिरप, पोलीस पाटील रामचंद्र साटम यांच्या उपस्थितीत महसूल पथकाने कोईल गावात खाडी किनारी पाहणी केली. यावेळी एका लोखंडी होडीत सक्शन पंप व साहित्य तसेच सुमारे दोनशे मीटर अंतरावर लोखंडी पाईप दिसून आला. हा पाईप ज्या ठिकाणी होता त्या किनारी काही वाळू रॅम्प व मुख्य रस्त्याला जोडणारा कच्चा रस्ता होता. येथून रात्री अनधिकृत उपसा केलेली वाळू ट्रक व डंपरच्या माध्यमातून वाहतूक करण्यास मार्ग होता.
सक्शन पंपाद्वारे काही तासात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करता येतो. पंपाद्वारे उपसा केलेली वाळू थेट किनारी आलेल्या डंपर मध्ये भरली जाते. त्यामुळे मनुष्यबळ वाचते. तसेच अवघ्या काही वेळेत डंपर भरला जातो. गेले काही दिवस मध्यरात्री वाळू उपसा सुरू असल्याचे बोलले जात होते. तरी याप्रकरणी सखोल चौकशी व कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.