सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील 70 पैकी 55 ग्रामपंचायतींवर भाजपचा विजय झाला आहे. यानंतर आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. राणेंना धक्का देणारा जन्माला ना आलाय, ना येणार असे नितेश राणे यांनी निवडणूक विजयानंतर म्हटले आहे.
राणेंना धक्का देणारा ना जन्माला आलाय, ना येणार - नितेश राणे - nitesh rane
सिंधुदुर्गातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर नितेश राणेंनी विरोधकांना इशारा दिला आहे. राणेंना धक्का देणारा जन्माला ना आलाय, ना येणार असे नितेश राणे यांनी निवडणूक विजयानंतर म्हटलंय.
राणेंना धक्का देणारा ना जन्माला आलाय, ना येणार - नितेश राणे
ही निवडणूक खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील आहे आणि शेतकरी मतदारराजा आहे. त्यांनी भाजपाला दिलेले मतदान हे कृषी कायद्याला दिलेले समर्थन आहे असंही नितेश राणेंनी म्हटलंय. सिंधुदुर्गात ७० पैकी ५५ ग्रामपंचायतींमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. हा विजय पंतप्रधान मोदी यांच्या कृषी कायद्यांना समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.