सिंधुदुर्ग -नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प आणि सी-वर्ल्ड प्रकल्प हा नियोजित जागी होणार, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
नाणार प्रकल्प आणि सी-वर्ल्ड नियोजित जागीच होणार - नारायण राणे - Sea-World project
नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प आणि सी-वर्ल्ड प्रकल्प हा नियोजित जागी होणार, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
सी-वर्ल्ड आणि नाणार नियोजित जागी होणार -
एस टी कर्मचाऱ्यांची वाईट अवस्था आहे, पगार वेळेवर नसल्याने ते आत्महत्या करत आहेत. खरंतर त्यांच्या उत्पन्नातून एसटी चालू शकतात. जेवढं कमवलंय सर्वाचे पैसे तो गोळा करतो, तो कलेक्टर आहे शिवसेनेचा, अशी घणाघाती टीका नारायण राणेंनी अनिल परब यांच्यावर केली आहे. तर नाणार आणि सी वर्ल्ड प्रकल्प त्याच जागी होणार, कोणी काहीही न करता ती जागा बदलणार म्हणतायत याला काय अर्थ आहे. हे दोन्ही प्रकल्प त्याच जागी होणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी केली आहे.
हे ही वाचा -अभिनेत्री जुही चावलाच्या 'या' एका चुकीमुळे आर्यन खानचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम एका रात्रीने वाढला
संप काळातच एसटी बस चालकाची आत्महत्या -
राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संप काळातच एसटी बस चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आलीय. एसटीच्या मागील बाजूला एसटी ड्रायव्हरने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला होता. अहमदनगरमध्ये शेवगाव येथील एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटी बसला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली होती. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.