महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कुणकेश्वर यात्रा रद्द - Kunkeshwar Devasthan Yatra News

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना जिल्ह्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानची यात्रा रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात माहिती दिली.

Kunkeshwar Yatra Information Uday Samant
कुणकेश्वर यात्रा उदय सामंत माहिती

By

Published : Feb 28, 2021, 5:24 PM IST

सिंधुदुर्ग -कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना जिल्ह्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानची यात्रा रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात माहिती दिली.

माहिती देताना मंत्री उदय सामंत

हेही वाचा -संजय राठोड यांच्यावर कारवाईसाठी सिंधुदुर्गात भाजपा महिला आघाडीचा रास्तारोको

11 ते 13 मार्च दरम्यान होणारी यात्रा रद्द

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानची 11 ते 13 मार्च दरम्यान होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कुणकेश्वर देवस्थानच्या आगामी यात्रा नियोजनाबाबत मंदिराच्या विश्वस्तांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामंत यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जि.प. अध्यक्ष समिधा नाईक उपस्थित होत्या.

50 भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडता येतील

पालकमंत्री पुढे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा जरी रद्द झाली असली, तरी यात्रेदरम्यान मंदिर समिती विश्वस्तांसह केवळ 50 भाविकांच्या उपस्थितीत देवस्थानचे नित्योपचार, तसेच इतर धार्मिक विधी पार पाडता येतील. मात्र, हे विधी पार पाडत असताना त्यामध्ये किमान अर्ध्या तासाचे अंतर ठेवावे. त्याचबरोबर, मंदिरात कोविड संदर्भातील सर्व निकषांचे पालन करण्यात यावे. आरोग्य विभागाने या ठिकाणी पथक नेमावे. त्याचबरोबर, यात्रेदरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवावा. मंदिरात भाविकांनी एकत्रित गर्दी करू नये, असे सांगून कुणकेश्वर ग्रामस्थांनी यात्रा निर्विघ्नरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सामंत यांनी केले.

आराखडा 170 कोटी रुपयांवर पोहचला

जिल्हा नियोजनाचा 143 कोटी रुपयांचा आराखडा 170 कोटी रुपयांवर पोहचला आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. 78 कोटी रुपये आपल्याला रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मिळालेले आहेत, असेही ते म्हणाले. सिंधुरत्न योजनेसाठी अर्थमंत्र्यांनी पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आखलेली चांदा ते बांद या योजनेमधील प्रलंबित कामे सिंधुरत्न योजनेमध्ये घेण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा -'सामना'च्या संपादकीयमध्ये आता कथा लिहिल्या जातात - तावडे

ABOUT THE AUTHOR

...view details