महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पक्ष वाढीसाठी काँग्रेसकडून गोव्यात 'निजाचो काँग्रेसमन' अभियान - काँंग्रेस न्यूज अपडेट

आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी गोवा प्रदेश कॉंग्रेसकडून 'निजाचो काँग्रेसमन' (एकनिष्ठ कॉंग्रेसवाला) अभिमान राबवण्यात येणार आहे. या अभियानाला 15 एप्रिलपासून सुरुवात होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली आहे.

काँग्रेसकडून गोव्यात 'निजाचो काँग्रेसमन' अभियान
काँग्रेसकडून गोव्यात 'निजाचो काँग्रेसमन' अभियान

By

Published : Apr 10, 2021, 6:22 PM IST

पणजी -आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी गोवा प्रदेश कॉंग्रेसकडून 'निजाचो काँग्रेसमन' (एकनिष्ठ कॉंग्रेसवाला) अभिमान राबवण्यात येणार आहे. या अभियानाला 15 एप्रिलपासून सुरुवात होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली आहे. ते पणजीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

15 एप्रिलपासून अभियानाला सुरुवात

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चोडणकर म्हणाले की, सध्या पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात येत आहे. तेव्हा आमच्या असे लक्षात आले की, गोव्यात अशा कितीतरी व्यक्ती आहेत, ज्यांनी कधीच काँग्रेसशिवाय दुसऱ्या पक्षाचा विचार केला नाही. मग ते कार्यकर्ते असतील, किंवा मतदार ज्यांनी कधीच मतदान करताना काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षांना मतदान केले नाही. अशा नागरिकांचा सन्मान करण्यासाठी पक्षाच्या वतीने 'निजाचो काँग्रेसमन' हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाला 15 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

काँग्रेसकडून गोव्यात 'निजाचो काँग्रेसमन' अभियान

'अभियानाची पक्ष वाढीसाठी मदत'

या अभियानामध्ये पक्षाचे नेते एक दिवस एका विधानसभा मतदासंघात फिरून अशा व्यक्तींच्या घरी भेटी देणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यातून पक्ष वाढीसाठी देखील मदत होणार असल्याचे चोडणकर यांनी सांगितले आहे. दरम्यान मडगाव नगरापलिकेमध्ये काँग्रेसने दुसऱ्या पक्षाशी केलेल्या आघाडीविषयी विचारले असता, चोडणकर म्हणाले की, सदरची निवडणूक पक्ष चिन्हावर होत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर अशा प्रकारे आघाडी करायचे आधिकार आहेत.

हेही वाचा -सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण; खासगी रूग्णालयात उपचार सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details