सिंधुदुर्ग - शिवसेना ही चळवळीतून काम करणारी संघटना आहे. महागाईविरोधात प्रत्येकवेळी शिवसेनेने आंदोलन केले आहे. महाग झालेली प्रत्येक गोष्ट लोकांना योग्य दरात किंवा मोफत मिळवी यासाठी शिवसेना कायम प्रयत्न करत असते. पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असल्याने प्रातिनिधीक स्वरुपात एक लिटर पेट्रोल मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. शिवसेना वार्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला होता. मात्र, काही लोकांना ते पटले नाही, म्हणून त्यांनी गोंधळ घातला अशी प्रतिक्रियी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. आमच्या या उपक्रमामुळे भाजपाला मळमळ झाली, असा टोलाही नाईक यांनी लगावला आहे.
'पेट्रोलचे गगनाला भिडलेत'
कुडाळमध्ये शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी स्वस्त पेट्रोल वाटप सुरू केले होते. मात्र, तो पेट्रोलपंप नारायण राणेंचा निघाला आणि त्यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यात राडा झाला होता. याविषयी बोलताना वैभव नाईक म्हणाले, पेट्रोलचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. शेतीची कामे सुरू झाल्याने, शेतकऱ्यांना पॉवर ट्रिलरमध्ये पेट्रोल, डिजेलची आवश्यकता आहे. रिक्षावालेही मेटाकुटीला आले आहेत. त्यांना काही प्रमाणात मदत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला होता, असेही वैभव नाईक यावेळी म्हणाले आहेत.
'सरकारला जाग यावी यासाठी हा उपक्रम'