सिंधुदुर्ग - जिल्ह्यामध्ये सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दौरा अंतिम टप्यात असताना शिवसेना भाजपात बॅनर वॉर रंगू लागले आहे. देवगडमध्ये शनिवारी भाजपच्या लागलेल्या बॅनरला शिवसेनेने कणकवलीत बॅनरने उत्तर दिले आहे. यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सिंधुदुर्गात वातावरण तापले, भाजपच्या बॅनरला शिवसेनेकडून बॅनरनेच उत्तर - shivsena
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता बॅनर वॉर रंगू लागले आहे. देवगड येथे काल लावलेला बॅनर "ते असतानाही नाही, संपवू शकले, ते आता काय संपवणार" "'दादा'गिरी" या मथळ्याखाली बॅनर लागल्यानंतर शिवसेनेकडूनही त्याला कणकवलीत चोख प्रत्युत्तर दिले गेले आहे.
देवगडमध्ये झळकला भाजपचा बॅनर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता बॅनर वॉर रंगू लागले आहे. देवगड येथे काल लावलेला बॅनर "ते असतानाही नाही, संपवू शकले, ते आता काय संपवणार" "'दादा'गिरी" या मथळ्याखाली बॅनर लागल्यानंतर शिवसेनेकडूनही त्याला कणकवलीत चोख प्रत्युत्तर दिले गेले आहे. "ते राज्यात मंत्री असताना कोकणात पराभूत केले. ते केंद्रात मंत्री होऊन काय फरक पडणार" अशा आशयाचा बॅनर कणकवलीत शिवसेना जुन्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ लावण्यात आला आहे. हा बॅनर सध्या कणकवलीत चर्चेचा विषय बनला आहे.
हेही वाचा -अनिल परब यांनी ईडीने पाठवलेल्या नोटीसवर देवेंद्र फडणविसांची प्रतिक्रिया, म्हणाले....