सिंधुदुर्ग -शिवसेनेचा आणि मातोश्रीचा आमदार दिपक केसरकर यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले, म्हणून केवळ वरिष्ठ नेत्याचे लक्ष वेधण्यासाठी केसरकर राणेंवर टीका करत सुटले आहेत, अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे.
'..त्यामुळेच माजी मंत्री दीपक केसरकर याना मंत्रिपदापासून दूर ठेवलं' - दीपक केसरकर बातमी
दीपक केसरकर हे गेले आठ महिने मतदारसंघातून गायब होते. केसरसर यांनी अचानक जिल्ह्यात एन्ट्री घेत राणेंवर टीका केली. परंतु येथील जनतेला सुध्दा त्यांचा खरा नेता कोण, हे माहीत आहे. त्यामुळे केसरकर यांनी नाहक दिखावूपणा करू नये, असा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी लगावला आहे.
दरम्यान फक्त सावंतवाडी शहरापुरते मर्यादित असलेल्या दिपक केसरकरांना नगराध्यक्षांसह आमदार होण्याची संधी केवळ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच मिळाली. त्यामुळे आयत्या बिळावर नागोबा म्हणून बसलेल्या केसरकरांनी आम्हाला निष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत, असेही त्यांनी सांगितले. सावंतवाडीत झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार दीपक केसरकर यांनी खासदार नारायण राणेंवर टीका केली होती. तसेच आपण नाराज असल्याचे म्हटले होते. भाजपाकडून आपल्याला ऑफर होती, पण ती आपण नाकारल्याचा दावाही त्यांनी केला होता.
याच पार्श्वभूमीवर राजन तेली यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले शिवसेना पक्षप्रमुखांचा आता केसरकरांवर म्हणावा तसा विश्वास राहिला नाही, त्यामुळे त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले. ही वस्तूस्थिती आहे. परंतु त्या ठिकाणी वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी ते राणेंवर टीका करत सुटले आहेत. मात्र आपण केवळ राणेंच्या पाठिंब्यामुळे नगराध्यक्ष आणि आमदार होवू शकलो, हे त्यांनी विसरू नये, असा सल्ला त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, दीपक केसरकर हे गेले आठ महिने मतदारसंघातून गायब होते. केसरसर यांनी अचानक जिल्ह्यात एन्ट्री घेत राणेंवर टीका केली. परंतु येथील जनतेला सुध्दा त्यांचा खरा नेता कोण, हे माहीत आहे. त्यामुळे केसरकर यांनी नाहक दिखावूपणा करू नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.