सिंधुदुर्ग- जिल्ह्यात बोगस पास घेऊन अनेक चाकरमानी दाखल होत आहेत. याबाबत पुराव्यासह ही बाब आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. मात्र आपले कोणीच ऐकून घेत नाही, असे स्पष्ट मत सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.
बोगस पास प्रकरणी वरिष्ठांचे दुर्लक्ष, सावंतवाडी तहसीलदारांनी बोलून दाखवली व्यथा - बोगस पास प्रकरण सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत 15 हजार लोक असे बोगस पास घेऊन आल्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची व्यथा तहसीलदारांनी ईटीव्ही भारतकडे व्यक्त केली आहे.
तहसीलदार राजाराम म्हात्रे
सावंतवाडीमध्ये आलेल्या अनेक चाकरमानी लोकांचे पास आम्ही स्कॅन केले. त्यातील बरेच पास हे बोगस निघालेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 15 हजार लोक असे बोगस पास घेऊन आल्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. जिल्ह्यात अवैधरित्या प्रवासी येण्याची स्थिती अशीच सुरू राहिली, तर जिल्ह्यातील स्थिती हाताबाहेर जाईल, असेही तहसीलदार म्हात्रे यांनी सांगितले.