महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bird From Abu Dhabi : कोकणात आढळला अबुधाबी येथील टॅगिंग केलेला पक्षी, पाहा फोटो - मॅकवीन बस्टर्ड नावाचा हा विदेशी पक्षी

वनविभागाने हा पक्षी ताब्यात घेतला असून त्याला राजस्थान बॉर्डर मार्गे मायदेशी पाठवण्यासाठीचे प्रयत्न शासकीय पातळीवर सुरू करण्यात आले आहेत. (tagged Bird From Abu Dhabi)

Bird From Abu Dhabi
Bird From Abu Dhabi

By

Published : Nov 13, 2022, 7:03 PM IST

सिंधुदुर्ग - अबु धाबी येथील पायाला टॅग केलेला परदेशी पक्षी देवगड तालुक्यात आढळला आहे. (Bird From Abu Dhabi). देवगड तालुक्यातील मुणगे येथील समुद्र किनाऱ्यालगत संजय बांबूळकर यांच्या बागेत मॅकवीन बस्टर्ड नावाचा हा विदेशी पक्षी आढळला आहे. (Bird from Abu Dhabi found in Konkan). परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारीक फकीर, वनरक्षक राख यांनी त्या पक्षाला ताब्यात घेत त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत वैद्यकीय उपचार केले.

अबुधाबी येथील टॅगिंग केलेला पक्षी

पक्षी भरकटून सिंधुदुर्गात आला -याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानद वन्यजीव संशोधक नागेश दफ्तरदार यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असता मुंबई येथील बिएनएचएस संस्थेकडून याबाबत माहिती घेण्यात आली. आखाती देशांत असे पक्षी संवर्धन हेतूने प्रजनन साठी वाळवंट परिसरात सोडले जातात. त्यातील काही पक्षी हे राजस्थान मधील वाळवंटी भाग तसेच गुजरात बॉर्डर पर्यंतही येतात. त्यातीलच हा पक्षी भरकटून सिंधुदुर्गात आला असावा. सदर पक्षी बीएनएचएस संस्थेच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा राजस्थान बॉर्डरवर सोडण्याबाबत प्रशासकीत पातळीवर हालचाली सुरू आहेत.

अबुधाबी येथील टॅगिंग केलेला पक्षी

पक्ष्याची प्रकृती उत्तम - परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुंबई नॅशनल बर्ड सोसायटी सोबत आम्ही कोऑर्डिनेशन करत आहोत. ही संस्था या पक्षाबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर संपर्क साधत असून लवकरच या संदर्भात पुढील भूमिका स्पष्ट होणार आहे. सध्या हा पक्षी आमच्या ताब्यात असून त्याची प्रकृती एकदम ठीक आहे. या पक्षाला नैसर्गिक अधिवासात सोडायचे की राजस्थान बॉर्डरवर नेऊन सोडायचे यासंदर्भात विचार विनिमय सुरू आहे. दरम्यान समुद्रालगतच्या गावात सापडलेला हा पक्षी समुद्रमार्गे भरकटत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला असावा अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

अबुधाबी येथील टॅगिंग केलेला पक्षी

ABOUT THE AUTHOR

...view details