सिंधुदुर्ग -हिम्मत असेल तर या आमनेसामने मैदानात या आणि मैदानात आल्यानंतर पळून जाऊ नका, असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी एमआयएम पक्षाचे माजी आमदार यांना दिले आहे. वारिस पठाण यांनी कर्नाटकातील एका सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून कणकवली येथे शनिवारी पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून कणकवली येथे शनिवारी पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. हेही वाचा -'मी गृहमंत्री म्हणून सांगतो की.. महाराष्ट्रातील एकाचेही नागरिकत्व जाणार नाही'
यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणाही देण्यात आल्या. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार अॅड. अजित गोगटे, प्रज्ञा ढवण, राजन चिके, संतोष कानडे, रवी शेट्ये, मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, डॉ. हर्षद पटेल, अॅड. राहुल तांबोळकर, दादा पावसकर, योगेश ताम्हाणेकर, अखिल आजगावकर, आदी. यावेळी उपस्थित होते.
वारिस पठाणांचे वादग्रस्त वक्तव्य -
'आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. जर आम्हीही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू' असे वादग्रस्त विधान पठाण यांनी केले होते.