महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गमधील मालवण येथील स्वॅब संकलित केंद्र कर्मचाऱ्यांअभावी बंद - मालवण कोरोना बातमी

मालवण ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेले स्वॅब संकलित केंद्र कर्मचाऱ्यांअभावी बंद पडले आहे. ही सेवा देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक अकार्यक्षम असल्याचा आरोप करत मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध केला.

MNS activist
MNS activist

By

Published : Jul 27, 2020, 5:43 PM IST

सिंधुदुर्ग - गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेली स्वॅब टेस्टींगची सोय कर्मचार्‍यांअभावी बंद पडली आहे. त्यामुळे ऐन चतुर्थीत येणार्‍या चाकरमान्यांची तपासणी कशी करणार, असा प्रश्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान, ही सेवा देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक अकार्यक्षम असल्याचा आरोप करत मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध केला.

येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज ग्रामीण रुग्णालयाला धडक देत वस्तूस्थितीची पाहणी केली. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, शैलेश अंधारी, विल्सन गिरकर, पास्कोल रॉड्रीक्स, विनायक गावडे, मोनिका फर्नांडीस, भारती वाघ, गुरू तोडणकर, गणेश गावडे, दिनेश कदम, अजित चौकेकर, प्रशांत परब, किशोर गावडे, अल्बर्ट रॉड्रिक्स आदी उपस्थित होते.

मालवण ग्रामीण रुग्णालयात स्वॅब संकलित केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची आवश्यकता असताना फक्त एकच डॉक्टर कार्यरत आहे. कर्मचारीही कमी आहेत, असे असताना जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय चाकूरकर यांनी मनमानीपणे येथे कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञाला आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यामुळे सुरू असलेले स्वॅब संकलित केंद्र बंदावस्थेत आहे. तसेच कनिष्ठ लिपिकाची बदली केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये येत्या आठ दिवसांमध्ये चाकरमान्यांचा ओघ वाढणार आहे. त्यामुळे त्यांना स्वॅब तपासणी करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

रुग्णालयात कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी बालाजी पाटील 24 तास अहोरात्र सेवा देत आहेत. परंतु, त्यांना वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही प्रकारची मदत केली जात नाही. याठिकाणी अद्यापपर्यंत थर्मल गन, ऑक्सीमीटर, पीपीई किट सुद्धा देण्यात आलेले नाही, असे आरोपही यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details