सिंधुदुर्ग :महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्गात आलेल्या ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे ( Thackeray Shiv Sena Deputy Leader Sushma Andhare ) यांनी कणकवलीत राणेंच्या होमपीचवर नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर टीका (Criticism of Narayan Rane and his two sons ) केली. सुषमा अंधारे यांनी नारायण राणेंचे नाव घेताच उपस्थितांनी कोंबडी चोर म्हणून ओरड करायला सुरवात केली. यानंतर अंधारे यांनी माझे दोन बारके बारके भाचे म्हणत आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचाही समाचार घेतला.
अंधारे यांनी पोलीस खात्याचाही समाचार घेतला : यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी नारायण राणे नितेश राणे यांच्या वक्तव्याच्या स्लाईड दाखवत त्यांची काँग्रेस, स्वाभिमान संघटना, आणि आता भाजपामधील वक्तव्य कशी बदलत गेली हेच लोकांसमोर दाखवले. अंधारे यांनी प्रोजेक्टरवर नितेश राणे यांचे सावरकरांबद्दल चे जुने ट्विट दाखवत त्यांच्या इंग्रजी लेखनाचा अनुवाद लोकांसमोर मांडला. सावरकर यांनी ब्रिटिशांसमोर चार वेळा माफी मागितली असा माणूस युवकांचे प्रेरणास्थान होऊ शकत नाही. हे ट्विट करणारे आपले बालके लेकरू नितेश राणे आहे. असे सांगतानाच हे ट्विट राणेंच्या पोराने केले आहे आणि पोरांचाच बाप आम्हाला शहाणपण शिकवतोय. हे लोकांना आम्ही सांगायला लागलो तर डिपार्टमेंट वाला कॅमेरा घेऊन आमच्यावरच, असे विधान करत अंधारे यांनी पोलीस खात्याचाही समाचार घेतला. सावरकरांबद्दल भाजपाला एवढेच प्रेम होते तर आतापर्यंत भाजपाने त्यांना भारतरत्न का जाहीर केलं नाही असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.